राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादित जागेचा मोबदला मिळाला नाही तर सहकुटूंब उपोषणाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आपले आई-वडील, भाऊ असे ज्यांच्या सोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणतात. पण तिच माणसं पैशासाठी भाऊ बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण करत आहे ” चुलत भाऊ पक्का वैरी पैशांसाठी आणि मालमत्तेसाठी भाऊ एकमेकांच्या जिवावर उठत आहे.चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी भुमापन क्रमांक ३.६४ आराजी पैकी ६३०० चौरस मीटर जागा ही चिमुर ते उमरेड राष्ट्रीय महामार्गा करीता भूसंपादीत केली असुन सात बारा वरील दर्ज असलेले ११ नविन वारसदार ,हिस्सेदार यांनी कुठलीही संमती न घेता जागेचा मोबदला न मिळाला असल्याने सदर जागा भूसंपादित केली असून त्यांचे नोटीस चिमूर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयामार्फत दिनांक १६/०३ / २० २३ रोजी नोटीस पाठवण्यात आले त्याचप्रमाणे दिनांक २०/०३/२० २३ रोजी उपविभागीय कार्यालय येथे सर्व वारसांना बोलवण्यात आले परंतु सदर नोटीस सर्व वारसांना प्राप्त झालेले नाही व आमच्यापर्यंत नोटीस प्राप्त होऊ दिला नाही.
आम्ही सर्व मय्यत शामराव भदूजी धनोरे यांचे ४ वारस असुन वारस हक्कांचे सदर फेरफार करून सात- बारा वर नावे दर्ज झाले आहे. सदर शेतीचा भुसंपादनाचा आमचे हिश्याला येनारा मोबदला मिळने आवश्यक होते परंतु नरेश तानबाजी धनोरे पिपंळनेरी येथील रहिवाशी आहे यांनी आम्ही सर्व वारसांन बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेत सर्व वारसांना कोणतेही माहीती पोहचु दिली नाही व आमचे कडुन कोणतीही संमती न घेता भुसंपादक कार्यालयात अधिकार्या सोबत संगमंत करून भुसंपादनाची प्रकिया पुर्ण केली सदर शेत जमीनीचा भुंसंपादनाचा मोबदला १,१९२०१९४ अक्षरी रुपये एक करोड एकोनीस लाख विस हजार एकशे चौर्यानव रुपये मोबदला शासनाने विस्तारीत केला पंरतु सदर रंक्कम वारसांनाच्या संमती शिवाय नरेश तानबाजी धनोरे यांनी अधिकाऱ्यांची संगनमताने खोटे दस्तावेज सादर करून रक्कमेंची उचल केली वारसदारांना हिश्याला येणारी रंक्कम दिली नसून सर्व वारसांना त्याच्या हक्काने वंचीत केले.
आमची वडीलोपारजीत शेती गेली व मिळणारा मोबदला गेला त्यामुळे मानसिक त्रास होत असुन आम्ही सर्व वारसाहक्काने हतबल झालेलो आहोत या घटनेची सर्व माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर विभागीय आयुक्त नागपूर यांना उचित कारवाई करिता पत्रव्यवहारद्वारे माहिती दिली आहे राष्ट्रीय महामार्गाचे रोडचे काम सुरू आहे,आमच्या हिश्याला सदर रस्ता बनवण्याचे काम थांबविण्यात यावे व आमचा वारसहक्कांचा मोबदला मिळण्यात यावा , सात दिवसाचे आत न्याय न मिळाल्यास आम्ही सर्व सहकुटुंब तयार होणाऱ्या रोडवर रास्ता रोको,उपोषणाला बसू अशी माहिती अविनाश केमये, संगिता केमये राजेद्र धनोरे सुरेखा मनोहर,विभा मदन बडगे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली आहे.