जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:- महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियनचे यवतमाळ जिल्हा अधिवेश नुकतेच दि.23 आॅगस्ट 2023 रोजी मारेगाव येथील कॉ.नथ्थुपाटील किन्हीकर सभागृहात उत्साहात संपन्न झाले. जिल्हातुन वणी,मारेगाव , झरी , नेर , यवतमाळ, पांढरकवडा, घांटजी , दिग्रस , तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते प्रा.धनंजय आंबटकर हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन युनियनचे राज्यसचिव कॉ.शिवकुमार गणविर (गोंदिया) .प्रमुख अतिथी म्हणुन कॉ.तुकाराम भस्मे,(के.क.स.न्यु.दिल्ली) प्रागतिक आघाडीचे विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट, भाकप वणी, कॉ.अनिल घाटे, जिल्हा सचिव भाकप , यांनी मार्गदर्शन केले कॉ.ऋषी उलमाले,,डॉ.तांबेकर यावेळी उपस्थित होते या अधिवेशनात शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा होऊन ठराव घेण्यात आला.
गायरान व वनजमिनीवरील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचा जमीनीचा पट्टा देण्याच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, पैसे न देता राशन धान्य द्या, घरकुल योजनेची अंमलबजावणी करा,रेशन , पेन्शन ,निराधार योजनेची अंमलबजावणी करा, इत्यादी ठराव घेण्यात आले येणाऱ्या काळात शेतमजूरांच्या मागण्यांना घेऊन प्रखर लढा उभारण्याचे ठरले, आगामी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
तसेच पुढील तीन वर्षांकरीता जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, ( बंडू गोल्हर , जिल्हाध्यक्ष) ( वासुदेव गोहने, कार्याध्यक्ष ) (प्रवीण आडे ,जिल्हासचिव) (भारत केमेकर , सहसचिव) (निरंजन गोंधळेकर, कोषाध्यक्ष) ( प्रमोद, पहुरकर, उपाध्यक्ष ) (दिलीप महाजन ,उपाध्यक्ष )तर सुधाकर मेश्राम, रंजना टेकाम,ईत्रारी भोशे, सुरेश जुनगरी , उत्तम गेडाम , दतु कोहळे , अशी एकूण १३ लोकांची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली, अधिवेनाचे सुत्रसंचलन बंडु गोलर यांनी तर आभार वासुदेव गोहणे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ.श्रीकांत तांबेकर , शेख खलील , प्रफुल आदे, धनराज अडबाले,लता रामटेके,अर्थव निवडीग ,अक्षय रामटेके, यांनी परिश्रम घेतले असी माहीत प्रसिद्धीपत्रकाव्दारे कॉ. दिवाकर नागपुरे यांनी दिली आहे.