जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:-शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अंधेरी पश्चिम विधानसभा शाखा क्र.६६ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे साहेब यांच्या कल्पनेने सुरू झालेल्या ” होऊ द्या चर्चा ” हा कार्यक्रम सागरसिटी , SRA BLDG No.7 येथे पार पडले . याप्रसंगी स्थानिक रहिवाशांकडून आपल्या समस्या मांडण्यात आले आणि त्याचे निवारण करण्यात आले . तसेच उपविभाग प्रमुख श्री प्रसाद आयरे साहेब यानी केंद्र सरकारच्या भोंगळ आणि भोंदू कारभारावर टीका केली. अशी अनेक उदाहरणे जनते समोर मांडून यांच्या जाहिरातबाजी मधला भंपक पणा उघड केला.
शाखाप्रमुख उदय महाले साहेबानी रहिवाशांच्या समस्येविषयी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त , उपायुक्त आणि झोपू योजनेचे CEO सतीश लोखंडे यांची वेळ घेवून चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले .
याप्रसंगी स्थानिय उपविभाप्रमुख प्रसाद आयरे,स्थानिय शाखाप्रमुख उदय महाले , म.शाखा संघटिका प्रज्ञा सावंत , कार्यालयप्रमुख योगेश रसाळ उपशाखा प्रमुख इराण्णा पुजारी, अन्सार शेख , म.उपशाखा संघटिका मीनाली आदी उपस्थित होते.