jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी -शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथे दिनांक २०/४/२०२५ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या संयुक्त विद्यमानाने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदाबहार प्रबोधनाचा लोक हितेशी वसा बहुजनात पेरण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज धारकर (सप्त खंजिरी वादक) सत्यपाल महाराज व संदीप पाल महाराज यांचे शिष्य अमरावती यांच्या कार्यक्रमा ची मेजवानी महापुरुषाच्या वैचारिक वारसा आपल्या प्रबोधनातून सादर करतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेशराव कुंभलकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खैरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुखदेव बोरखडे साहेब पोलीस निरीक्षक वडकी अंकुश भाऊ मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव श्रीकांत राऊत सरपंच खैरी रविभाऊ निव्वळ अध्यक्ष सहकार खरेदी विक्री संस्था खैरी राजूभाऊ भेदुरकर पोलीस पाटील खैरी डॉक्टर विठ्ठल लढे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते इंन्द्रजीत लभाने सामाजिक कार्यकर्ते अरविंद भाऊ ठाकरे सरपंच कुंभा शैलेश भाऊ बेलेकर उपसरपंच ग्रामपंचायत वडकी व समस्त राळेगाव तालुक्यातील जनतेला आयोजक राहुल उमरे (अध्यक्ष) उमेश भारशंकर (उपाध्यक्ष) सुमेध भरणे (सचिव) अरविंद थुल(उपसचिव) प्रमोद सातकर व समस्त आयोजक मंडळ खैरी यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन समस्त जनतेस केले आहे. स्थळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मैदान खैरी.