Breaking News

अपंग दिव्यांग बांधवांचा 5 टक्के निधी 5 वर्षापासुन गेलातरी कुठे?

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित आहे यासंदर्भात मागील 5 वर्षाचा नीधी गेला कुठे यांची चौकशी करुन संबंधित अधीर्यावर कार्यवाही करुन 5 वर्षासहीत लाभार्त्यांना येत्या 7 दिवसात निधी उपलब्ध करून वितरित करण्यात यावे अन्यथा नेरी ग्रामपंचायत समोर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेतर्फे संवर्ग विकास अधिकारी यांना 31 आगस्टला निवेदन देण्यात आले.
सदर दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीची तरतूद सरकारने केली असून ग्रामपंचायतीने हा निधी वित्त आयोग च्या आराखड्यात मंजूर केला असेल तर त्या निधीतून उपलब्ध करून लाभार्त्यांना वितरित केल्या जाते किंवा ग्रामपंचायत च्या सामान्य फडातून हा निधी उपलब्ध करुन लाभ दिल्या जाते किंवा ग्रामपंचायत या बाबत ठरविते ,दरवर्षी हा पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्ती ला वितरित करणे बंधनकारक आहे परंतु मागील पाच वर्षांपासून या निधीचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालाच नाही तेव्हा सदर ग्रामपंचायतीच्या हा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे अशीद अमरदीप मेश्राम आणि प्रवीण वाघे प्रहारसेवक यांनी अपंग दिव्यांग बांधवांना सोबत घेत सवर्ध विकास अधिकारी प.स. चिमूर यांना निवेदन दिले सदर याबाबत अपंग दिव्यांगनी नेरी ग्रामपंचायत ग्रामसेवक नखाते यांना विचारले असता त्यांनी तुमाला काय पाहिजे ते लेखी अर्ज द्या नंतर आम्ही विचार करू असे सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved