Breaking News

बॅड वाजंत्री व्यवसाईकांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

बॅड वाजविण्याची परवानगी द्या अन्यथा आंदोलन करु

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :-कोणताही सन अथवा उत्सवात कार्यक्रम वाजा वाजंत्री शिवाय अपुरा असतो.असे म्हणायला हरकत नाही.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने अख्ख्या जगात हाहाकार मचला आहे.त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत.मात्र सध्याच्या परिस्थितीत संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्नसंखेत सुद्धा घट होतांना दिसुन येतो. सध्याच्या परिस्थितीत सर्व व्यवसाइकांना शासनाने मुभा दिलेली आहे.

त्यामुळे सर्व व्यवसाइकांना त्यांचा उद्योग मिळुन आर्थिक हातभार लागत आहे. मात्र बॅड वाजंत्री नागरीकांवर गेल्या दोन वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आनी सध्या च्या परीस्थितीत सुद्धा सन उत्साहात बॅड वाजविण्याची चंद्रपूर जिल्ह्यात परवानगी नसल्यामुळे त्यांच्या रोजगारावर गदा आलेली असून त्यांचे कुटुंब उघड्यावर पाडण्याची वेळ आलेली आहे.

त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बॅड वाजंत्री नागरिकांची व त्यांच्या परीवाराची आर्थिक परिस्थिती मोठी हालाकीची झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रोजगार नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत. शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बॅड वाजविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र बॅड वाजविणारे व्यवसाइक व गरीब नागरीकांना हा अन्याय का? ही शंखा सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.

आमच्या निवेदनाच्या सहानुभूती पुर्वक विचार करून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सन उत्साहात तसेच ईतर कार्यक्रमात बॅड वाजविण्याची परवानगी प्रदान करावी. तसेच आम्हाला बॅड वाजविण्याची परवानगी न मिळाल्यास बॅड वाज्यासह आंदोलनास सुरवात करु असाही ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतांना शिवसेना ऊपजील्हा प्रमुख अम्रुत नखाते, चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोम्बरे, चिमुर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,

महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, तालुका संघटक रोशन जुमड़े, सचिन खाड़े, उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, विधा घुघूसकर, शहर प्रमुख अनंता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांच्या उपस्थित हे निवेदन देण्यात आले यावेळी उपतालुका प्रमुख किशोर ऊकुंडे सह शेकडो पुरुष महीलासह बॅड वाजंत्री व्यवसाईक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन …

हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 13 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved