तालुका प्रतिनीधी – शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील उच्च प्राथमिक केंन्द्र शाळा धानोरा येथे दि. 5/7/2023 ला शाळापूर्व तयारी मेळावा दुसऱ्यांदा घेण्यात आला या अगोदर एप्रिल महिन्यात घेण्यात आला होता, त्याच प्रमाणे धानोरा येथील रहिवासी उच्च श्रेणी मुख्याध्यापक येवती येथे कार्यरत असलेले बाबारावजी घोडे हे दि.30/6/2023 ला नियोतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यामुळे त्याचे धानोरा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार कण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वाल्मीकराव मुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी सुद्धा आतापर्यतंचे मुलांचे अनुभव सांगितले ,यावेळी पहिल्या वर्गातील पालक व मुंले व शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर ,सत्कार मुर्ती बाबाराव घोडे,समिती सदस्य वाल्मीकराव मुडे, शाळेचे मुख्याध्यापक विलास डोंगरे,शिक्षक संदिप टुले, शिक्षीका धुर्वे मॅडम,केदार मॅडम, चौधरी मॅडम, पेटकर मॅडम हे सर्व उपस्थित होते.