jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या कार्यरत असून त्या गरीब शेतकरी व महिलांना किरकोळ कर्जे पुरवत आहेत. या कर्जांचा उपयोग ते आपल्या दैनंदिन गरजांसाठी, शेतीसाठी, किंवा घरगुती खर्चासाठी करतात. परंतु या कंपन्यांचा कर्ज वसुलीचा पद्धतशीर आणि अन्यायकारक प्रकार आता अत्यंत चिंताजनक झाला आहे.अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या अत्यधिक व्याजदर आणि प्रचंड दंड आकारत आहेत. हप्ते थकवल्यास किंवा एखादा हप्ता बाउंस झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जातो. एवढेच नव्हे तर, काही ठिकाणी महिला व शेतकऱ्यांना धमकी देणे, मानसिक त्रास देणे व अपमानास्पद वर्तन करणे असे प्रकार समोर येत आहेत.
या सर्व प्रकारांमुळे गरीब शेतकरी व महिलांचे संपूर्ण मासिक उत्पन्न केवळ हप्ते व दंड भरण्यातच खर्च होत आहे. त्यांना दुसऱ्या कर्जाचे ओझे घेऊन पहिल्या कर्जाची परतफेड करावी लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून ग्रामीण भागातील लोकसंख्येवर अन्याय करणारी आहे.या पार्श्वभूमीवर आपण उपाययोजना तातडीने राबवाव्यात, यासाठी आम आदमी पार्टी चे चिमूर-नागभीड विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी मा. जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे पत्र पाठविले आहे.
या पत्रामध्ये चिमूर व परिसरात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची चौकशी करून त्यांच्या कर्ज धोरणांची तपासणी करावी, त्यांच्या व्याजदर व दंड मर्यादित करण्यासाठी नियमन करावे, कर्जदार शेतकरी व महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र किंवा हेल्पलाईन सुरू करावी, सुरक्षित व माहितीपूर्ण कर्ज घेण्यासंदर्भात ग्रामपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी, बेकायदेशीर वसुली पद्धती रोखण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणांशी समन्वय ठेवून कारवाई करावी याविषयी उपाययोजना सुचविल्या आहेत.ही बाब केवळ आर्थिक शोषणाची नसून ग्रामीण महिलांच्या व शेतकऱ्यांच्या सन्मान व सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे कृपया या विषयात तातडीने लक्ष घालावे व योग्य ती कार्यवाही करावी याबद्दल आम आदमी पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आलेली आहे.