Breaking News

जिल्ह्यात शुक्रवारी पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात संतोषसिंह चंदनसिंह रावत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुधीर महादेव टोंगे (अपक्ष), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात निरंक आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 22 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 10 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

रस्ते अपघात टाळण्यासाठी वडकी पोलीस स्टेशन येथे हेल्मेट लकी ड्रॉ

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * कायद्याचे धाकाने नको तर स्वतः ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved