jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* कायद्याचे धाकाने नको तर स्वतः ला सुरक्षीत ठेवण्यासाठी नियमाचे पालन करा – रामकृष्ण वेंजणे *
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- दिनांक २८/०६/२०२५ रोजी पो.स्टे. वडकी येथे पोलीस स्टेशन वडकी व एन.एच. आय यांच्या संयुक्तीकरित्या आयोजित केलेल्या रोड अपघाताला आळा घालण्यासाठी व वाहतुक नियमाच्या जन जागृतीसाठी एक आगळा वेगळा हेल्मेट लकी ड्रॉ चा कार्यक्रम पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील सुमारे ५० ते ५२ गावातील सुमारे ३०० लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जमलेल्या ३०० लोकांमधुन ईश्वर चिड्डी व्दारे लकी ड्रॉ च्या चिठ्ठ्या काढून ५० दुचाकी धारकांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे.
तत्पुर्वी ठाणेदार सुखदेव भोरकडे पो.स्टे. वडकी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केल्यानंतर अमीतकुमार राणा, प्रोजेक्ट मॅनेजर एन.एच.आय.टी. व बजरंग चौधरी मॅनेजर टेक एन.एच.ए.आय यांनी जमलेल्या लोकांना रोडने ये-जा करीत असतांना घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजणे सा. यांनी जमलेल्या लोकांना रस्ता अपघाताची गांभीर्यता पटवुन सांगत असतांना त्यांनी सांगीतले की,फक्त यवतमाळ जिल्ह्यात मागील एका वर्षात ४२० लोकं रोड अपघातात मयत झाले आहेत.
त्यांचे मागे असलेले त्यांची पत्नी, मुलेबाळे, आई-वडिल असे सुमारे २००० लोकांचे वर लोकं निराधार होवुन हालअपेष्टेत जिवन जगत आहे.त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या धाकाने नव्हे, तर आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी,भविष्यासाठी सर्वांनी वाहतुक नियामांचे पालन करावे असे या कार्यक्रमाला जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रम जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतुन व अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनातुन व उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजने,अमीतकुमार राणा,प्रोजेक्ट मॅनेजर एन.एच.आय.टी. व बजरंग चौधरी मॅनेजर टेक एन.एच.ए. आय,निखील पांडा रोड सेफ्टी मॅनेजर,एन.एच. आय.टी.राहुल सिंग मॅटर्नस मॅनेजर एन.एच.आय.टी.यांचे प्रमुख उपस्थीतीत पार पडला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी बडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच एन.एच. आय कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली .