jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यातील नागरिक मागील १ महिन्या पासून दिवसापासून बीएसएनएल मोबाईल आणि इंटरनेट सेवेमुळे कंटाळले असून चिमूर शहरातील मुख्य कार्यालयच बंद अवस्थेत आहे.चिमूर तालुक्यात सर्व खाजगी दूरसंचार कंपन्यांची सेवा सुरळीत सुरू असून फक्त बी.एस.एन.एल ची सेवा मात्र ठप्प झाली आहे. चंद्रपूर येथील वरिष्ट अधिकाऱ्यांना फोन केला असता फोन उचलत नाही उचलला तर उडवाउडवीची उत्तरे देतात.
चिमूर येथील बीएसएनएल कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेले असता कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला ताला लावण्यात आलेला आहे. सरकारी कंपनी असलेल्या बी एस एन एल च्या ढिसाळ कारभाळामुळे आता लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की सरकारी अधिकाऱ्यांचे खाजगी कंपन्यांशी गुप्त संबंध आहे का ? सरकारी कंपनी जर नागरिकांची अशी उपेक्षा करीत असेल आणि कार्यालय बंद राहत असेल तर तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.