jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- दि.२८/०६/२०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतुन तडीपार इसम प्रतिबंधीत केलेल्या हददीत प्रवेश केल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीसांनी केला गुन्हा दाखलदि.२८/०६/ २०२५ रोजी दुपारी 01:00 वा चे सुमारास मुंगी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर येथील बस स्टॅन्ड समोर मा. उपविभागीय दंडाधिकारी सो पाथर्डी भाग, पाथर्डी यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. कवि/हददपार/एस.आर/०४/२०२४ अन्वये मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (१), (अ), (ब) अन्वये दि.२६/११/२०२४ रोजी अहिल्यानगर जिल्हा हददीतुन एक वर्षे कालावधी करीता हददपार केलेला इसम नामे त्रिंबक भानुदास रक्टे रा. मुंगी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा अहिल्यानगर जिल्हा हददीतील मोजे मुंगी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर येथे आलेला आहे.
अशी खात्रीशीर बातमी पो.नि.संतोष मुटकुळे सो शेवगाव पोलीस स्टेशन यांना मिळाल्याने त्यांनी नमुद ठिकाणी पोसई/प्रविण महाले सो, पोहेकों/ईश्वर गजें, पोकों/भगवान सानप, पोकों/देविदास तांदळे, पोकों ईश्वर बेरड व पोकों/राजेंद्र वडे अश्यानी सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने सदर पोलीस पथकाने मुंगी ता. शेवगाव जि.अहिल्यानगर या ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन पोकों/देविदास पांडुरंग तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ५७१/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर,प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर,सुनिल पाटिल उपविभागीय पो. अधिकारी, शेवगाव भाग शेवगाव यांचे मार्गदर्शानाखाली पो.नि.संतोष मुटकुळे,पो.स.ई.प्रविण महाले,पो.हे.कॉ.ईश्वर गर्जे, पो.कॉ.भगवान सानप, पो.कॉ. देविदास तांदळे, पो. कॉ. ईश्वर बेरड व पो.कॉ. राजेंद्र बडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.कॉ. राहुल गुडडू, पो.कॉ. प्रशांत राठोड यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढिल तपास पो.हे.कॉ. ईश्वर गर्जे हे करत आहेत.
*ताजा कलम*
*शेजारच्या संभाजीनगर बीड जिल्ह्यातून अनेक तडीपार गुंड शेवगांव पाथर्डी या भागात राजरोस दोन नंबर चे धंदे करतात त्यांच्या मुसक्या कोण आवळणार ??? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*