jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
*गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या आरोपीला शेवगांव पोलीसांनी चाकण एम.आय.डी.सी. जि.पुणे येथुन सापळा लावुन शिताफीने केले जेरबंद*
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- दिनांक- 06/05/2025 ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश्वर आसाराम देवढे वय 42 रा.दादेगाव,शेवगाव ता. शेवगाव जि.अहिल्यानगर यांनी दिनांक १८/०३ /२०२५ रोजी शेवगांव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशनला गुं.र.न. २५१/२०२५ भादवि कलम 420, 406, 409, सह कलम ३ एम. पी. आय.डी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयातील फिर्यादी प्रमाणे गुन्हयातील आरोपी जालींदर संतोष दहीवाळ हल्ली मुक्काम रा शास्त्रीनगर ता शेवगांव जि अहील्यानगर मुळ गावं रा.पाचोड ता. पैठण जिल्हा संभाजीनगर याने फिर्यादीस मी शेअर मार्केट मध्ये ट्रेडींग करतो,माझे कडे पैसे गुंतविल्यास मी तुंम्हाला मासीक १० टक्के परतावा देईल असे आमिष दाखवुन फिर्यादी कडुन रोख व ऑनलाईन स्वरुपात रक्कम रुपये ५,००,०००/- रुपये घेतले होते.
फिर्यादीस ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे परतावा अगर मुळ रक्कम न देता आरोपी हा पळुन गेला होता,सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील आरोपी जालींदर संतोष दहीवाळ याने फिर्यादी प्रमाणेच ईतर १९ लोकांकडुन देखील शेअर मार्केट ट्रेडींग व्दारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवुन त्यांचेकडुन देखील रोख व ऑनलाईन स्वरुपात ठेवी स्वीकारुन त्यांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे मुळ रक्कम व परतावा न देता त्यांची देखील फसवणुक केली असलेबाबत तपासात निष्पन्न झाले होते,फिर्यादी व १९ साक्षीदार यांची एकुण रक्कम रुपये १,२३,६७,६००/-फसवणुक केल्याचे निष्पन्न झालेले आहे.गुन्हयातील आरोपी जालींदर संतोष दहीवाळ हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार होता.मा.जिल्हा व सत्र न्यायालय अ.नगर यांनी आरोपीताचा अटकपुर्व जामीन अर्ज देखील फेटाळला होता.त्यामुळे आरोपी हा अटक चुकविण्यासाठी ठिकाणे बदलुन राहत होता.
सदर गुन्हयाचे तपास करीत असतांना गुन्हयाचे तपास अधिकारी स.पो.नि. धरमसिंग व्ही.सुंदरडे यांना दिनांक ०३/०६ /२०२५ रोजी गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशिर माहीती मिळाली कि,प्रस्तुत गुन्हयातील आरोपी लींदर संतोष दहीवाळ रा शास्त्रीनगर ता शेवगांव जि अहील्यानगर मुळ रा.पाचोड जिल्हा – संभाजीनगर हा चाकण जिल्हा- पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी पोनि समाधान नागरे यांना दिली.पानि समाधान नागरे यांनी सपोनि धरमसिंग सुंदरडे यांचे नेतृत्वात तात्काळ तपास पथक नेमुण आरोपीताचा शोध घेणे साठी तपास पथक चाकण जिल्हा- पुणे येथे रवाना केले होते.सदर गुन्हयातील आरोपी संतोष दहीवाळ कर याचा चाकण पोलीस स्टेशन जि.पुणे हददीत दिनांक ०४/०६/२०२५ रोजी शोध घेत असतांना तो रासे ता.चाकण येथे असल्याची माहीती मिळाल्याने शेवगांव पोलीसांनी स्थानिक चाकण पोलीसांसोबत मिळुन आरोपीता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला,
असता पोलीस पथकाची चाहुल लागताच आरोपी हा पळुन जात असतांना पोलीसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात दिनांक अटक केली आहे.वरिल आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन गोवा,उत्तर प्रदेश,गुजरात अशा विविध राज्यात वास्तव्य करत होता याची कबुली दिली आहे.वरिल आरोपी विरुध्द इतर कोणाची जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.समाधान नागरे,तपास अधिकारी स.पो.नि. धरमसिंग सुंदरडे, पो.कॉ. राहुल आठरे,पो.कॉ. श्याम गुंजाळ,होमगार्ड विजय तुपविहीरे,नगर दक्षिण जिल्हा मोबाईल सेल चे पो.कॉ. नितीन शिंदे व पो.कॉ. राहुल गुडडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास स.पो.नि. धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.
*ताजा कलम*
हे फरार भामटा बिगबुल जालिंदर दहिवळ मी एका पोलीस अधिकाऱ्याचा जवळचा नातेवाईक आहे आणि एक संभाजीनगरचा मोठा नेता मला प्रोटेक्शन देत आहे त्यामुळे माझं कोणी काही वाकड करू शकत नाही अशा वल्गना हे फरार असताना फसवणूक झालेल्या गुतंवणूकदारांना करत होता शेवगांव शहरातील काही गावपुढारी सुद्धा त्याला आतुन नेटाने सपोर्ट करत होते अशी दबक्या आवाजात फसवणुक झालेल्या गुतंवणूकदारांमध्ये होती.*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*