Breaking News

पांढरकवड्यात लेआउट धारकाकडून व्यवसायिकाच्या कारखान्यावर हल्ला

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* विद्युत खांब JCB ने पाडून वीजपुरवठा खंडित *

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

पांढरकवडा :- महालक्ष्मी प्रिकास्ट या सिमेंट उद्योग व्यावसायिकाच्या डोंगरगाव (ता. केळापूर) येथील भूखंडावर सुरू केलेल्या कारखान्यावर थेट हल्ला करत, विद्युत खांब पाडून विजेचा पुरवठा बंद केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यासंदर्भात पीडित व्यावसायिक अविरत रमेश झाडे यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, हे कृत्य अजय वासुदेव भोरखडे (रा. लटारे ले-आऊट, पांढरकवडा) व त्यांच्या सोबत आलेल्या ४-५ अनोळखी व्यक्तींनी केले आहे.

झाडे यांचे डोंगरगाव येथील भूखंड क्र. ३६/ए व ३६/ब अजय वासुदेव भोरखडे यांच्या मालकीचे असून त्याचा व्यवसाय प्लॉट पाडून विकण्याचा असून त्यामुळे सदर प्रस्तावित ले-आऊट मधील भूखंड क्र. ३६/ए व ३६/ब यातील जागा माझ्या पत्नीचे नावाने म त्यांच्या कडून विकत घेतल्याचा सौदा करून व त्याची होणाऱ्या रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम अदा केल्याने त्यांनी वरील भूखंडाचा लेखी ताबा दिल्यामुळे तसेच सदर जागेवर विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा घेण्यास संमती दिल्यावरून , त्यावर कारखाना उभारण्यात आला आहे. वीज व पाण्याचा पुरवठा सुरू असलेल्या या व्यवसायावर दि. ३१ मे रोजी दुपारी ३ वाजता अचानक भोरखडे आणि इतरांनी जेसीबीच्या सहाय्याने उभे विद्युत खांब पाडले. यामुळे संपूर्ण विजेचा आणि बोरवेलचा पाणीपुरवठा खंडित झाला असून उद्योग ठप्प झाला आहे.

झाडे यांच्या तक्रारीनुसार, या प्रकारामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, विद्युत महामंडळाचाही मालमत्तेचा नुकसानीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे कृत्य हे नियमबाह्य असून फौजदारी स्वरूपाचे असल्याचे झाडे यांनी स्पष्ट केले आहे.तरी पोलीस प्रशासनाने संबंधित अजय भोरखडे व इतर दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच जेसीबी मशीनवरही आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

बस स्थानक परिसरातुन प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” सोन्याचे दागीने २,५०,०००/- रुपयाची मालमत्ता केली जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved