jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, चंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंग, धूत ट्रान्समिशन, पटले प्लेसमेंट सर्विसेस, स्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेड, ब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविला. या रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिप, त्याचे फायदे, निवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केले. यावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळे, मनोज पाटील, श्री. खोब्रागडे तसेच इतर समन्वयक, बीटीआरआयच्या श्रीमती लोखंडे, श्री. महातो तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्री. नंदेश्वर, निमसरकार, चांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.