jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल डिबी पथक पोलीस स्टेशन मुल हृददीत पेट्रोलीग करीत असतांना वेळ ०४:१५ वाजताच्या सुमारास महाबिज केंद्र जवळ, मुल ते ताडाळा रोडवर, मुल येथे आरोपी गौरव नितीन नरूले वय २६ वर्ष, रा वार्ड क १२ मुल ता मुल जि चंद्रपुर हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल सह संशयीतरित्या मनाई केलेले एक देशी बनावटीचे लोखंडी अग्नीशस्त्र (पिस्टल), दोन जिवंत दारूगोळा (काडतुस), दोन मॅगझीन विनापरवाना बेकायदेशीर व अवैध्यरित्या अग्निशस्त्रासह लोकांना धाक दाखविण्याचा व आपली दहशत निर्माण करून मानवीय जिवीतास व त्यांचे वैक्तीगत सुरक्षीततेला धोका निर्माण होण्याच्या उददेशाने भविष्यात गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असतांना मिळुन आला.
त्याच्या कडुन देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल, लोखंडी मॅग्झीन सह किंमत ४०,०००/-दोन जिवंत काडतुस किंमत १०००/-, एक लोखंडी धातुची मॅग्झीन कि. २०००/-, एक जुना वापरता मोबाईल कि. १०,०००/-, एक बजाज पल्सर मोटार सायकल कि. ६०,०००/-असा एकुण १,३०,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन मुल येथे अप क २३५ / २०२५, कलम ३/२५, ७/२५ भारतीय शस्त्र अधिनीयम १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन आरोपीस अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सपोनि अमितकुमार आत्राम पो स्टे मुल हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात सुधाकर यादव, उविपोअधि, चंद्रपूर तथा मुल यांच्या मार्गदर्शनात सपोनी सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात सपोनी अमितकुमार आत्राम, पोउपनी भाऊराव बोरकर, पो. हवा जमिर खान पठाण, भोजराज मुंडरे, पोअं. चिमाजी देवकते, नरेश कोडापे, पंकज बगडे, शंकर बोरसरे सर्व पोस्टे, मुल यांनी केली आहे.