jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* महिलेने मानले पोलीसांचे आभार *
* मुल बस स्थानक परिसरातील घटना *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक ३० जुन, २०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल येथे तक्रारदार महिला नामे सौ. मंजुषा मनोज नैताम वय ३५ वर्ष रा. पडोली हया तिचे नातेवाईकांसह गडचिरोली येथुन चंद्रपूर ला जात असतांना मुल बस स्थानक परिसरात तिची कथ्या रंगाची लेटर बॅग ज्या मध्ये एक विवो कंपनीचा मोबाईल किं. ३०,०००/-, नगदी २५००/- रु., एक एटीएम कार्ड आणि महत्वाचे दस्तऐवज असलेली हरविल्याने तिने व तिचे नातेवाईकांनी सदर हरविलेल्या बॅग चा मुल आणि बस स्थानक परिसरात शोध घेतला परंतु बॅग मिळुन न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन मुल येथे येवुन तक्रार नोंदविली.
मुल पोलीसांनी सदर तक्रारीची तत्काळ दखल घेवुन सायबर पोलीस स्टेशन च्या मदतीने तांत्रिक पध्दतीने हरविलेल्या बॅग चा शोध घेवुन अर्ध्या तासाचे आंत सदर बॅग व त्यामधील वरील नमुद सर्व साहित्ये तक्रारकर्त्या महिलेस परत केले. यावरुन सदर महिलेने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुल पोलीसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी मुल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोउपनि वर्षा नैताम, नापोअं चिमाजी देवकते, पोअं. शंकर बोरसरे, नरेश कोडापे यांनी केली आहे.