Breaking News

खापरखेडा येथील पिपळा येथे भंतेजी ने केली आपल्या शिष्यची हत्या

प्रतिनिधी नागपूर

नागपूर : भंते भदंत धम्मानंद थेरो यांनी भंते सामनेर बुद्ध प्रियावर उर्फ कुसुम सुनील चव्हाण (वय ४५) भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप वार करुन तोंडावर हातोडा मारून हत्या केली. घटनास्थळावरून चाकू, हातोडा जप्त करण्यात आला. आरोपी बोधी धम्मानंद थेरो यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली.
सामनेर बुद्ध प्रिया हि इंदिरा नगर पेट्रोल पंप जवळ जरीपटका पोलिस स्टेशन समोर नागपूर येथील रहिवासी आहे. खापरखेडा परिसरातील पिपळा डाकबंगला येथे शिवली बोधी भिख्खू निवास येथे ती राहायची. शिवली बोधी भिक्कू निवास २०१७ पासून पिंपळा डाग बंगला येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू आले. भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम (वय ५८ वर्ष रा. पिंपळा डाग बंगला,मुळ गांव यशोधरा नगर संजय गांधी नगर वार्ड नंबर 2 फेजपुर अमरावती) यांनी बुद्धप्रिया पलंगावर झोपल्याची संधी साधून भाजी कापण्याच्या चाकूने मारले. तोंडावर डोक्यावर हातोडा मारून हत्या केली. खापरखेडा पोलिस ठाण्याचे उमेश ठाकरे, नूमान शेख यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved