Breaking News

वाडीत गॅस वायू गळती मुळे आग, 2 युवक जखमी

न प अग्निशमन विभागाने विझवली आग

प्रतिनिधी नागपूर

दवलामेटी(प्र):- वाडी परिसरातील एमआयडीसी चौक वळणा शेजारील जे पी रेस्टॉरंट च्या मागे असलेल्या भूषण स्टोल ला रविवारी सकाळी 6 वा. च्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
नप अग्निशमन विभागाने दिलेल्या माहिती नुसार या व्यवसायिक इमारतीत भागवत संतापे यांच्या मालकीचे भूषण टी स्टोल आहे. या दुकानात 4 व्यावसायिक व 1 घरगुती वापरायचे सिलेंडर्स ठेवले होते.रविवारी सकाळी 6 वाजता 2 कामगार युवक दुकान उघडून प्रवेश केला व आपल्या कामात व्यस्त असताना अचानक सिलिंडर मधून वायू गळती झाली व आजू बाजू च्या वस्तूने पेट घेतला.
आगीने क्षणात उग्र रूप धारण करून आगीचा भडका उडाला तिथे काम करीत असलेले हे 2 कामगार भाजून जखमी असवस्थेत बाहेर पळाले. आग दिसताच आज बाजू चे नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान नगर परिषद च्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या सूचनेवरून अग्निशमन दलाचे अधिकारी गौरव गाणार व त्यांचे सहकारीअनुराग पाटील, युगांत बिडकर, इंद्रजित इरपाती,आनंद शेंडे, वैभव कोळस्कर यांच्या सह घटनास्थळी धाव घेवून उग्र रूप धारण केलेल्या आगीला आटोक्यात आणले. त्यासोबतच गंभीरपणे जखमी युवकांना मेडिकल येथे पाठविण्यास मदत केली. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविल्याने दुकानावरून जात असलेल्या उच्च दाब विद्युत वहिनी मुळे होणारे नुकसान मात्र टळल्याची चर्चा परिसरात नागरिकांत दिसून आली.वाडी पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहचून मदत केली व स्थिती वर नियंत्रण ठेवले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अमरावती महामार्गावर स्कार्पिओ ला थांबवून युवकांनी केली 92 हजारांची लूट

वाडी पोलिसांच्या तत्परतेने ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन …

समस्याग्रस्त चर्चेत असलेली नेरी ग्रामपंचयतीने केला स्वच्छ भारत मिशनचा फज्जा

लाखो रुपये गेले पाण्यात,शौचालय बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच नेरी शहरात पिएचसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved