Breaking News

काँग्रेसने उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार – धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विधानसभा चिमूर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.२६/०७/२०२४ राज्यात येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांकडून विधानसभा उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसने मला उमेदवारीची संधी दिल्यास चिमूर विधानसभा क्षेत्रात मोठे औद्योगिक व्यावसायीक उपक्रम राबवून चिमूर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देणार असे मत धनराज मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी ओबीसी विधानसभा चिमूर यांनी व्यक्त केले.

चिमूर, नागभीड, भिसी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या हस्ते गरजु नागरीकांना व विद्यार्थ्यांना नोटबुक , छत्री व टि – शर्ट तसेच कापडी पिशवी चे वितरण करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते वामन गेडाम, राजु लोणारे , नागेश चट्टे रत्नाकर विटाळे, शांताराम शेलवटकर, प्रदिप तळवेकर , विलास मोहिनकर , संदिप घोडमारे , दिलीपराव गंधारे , जाबिर कुरेशी , अक्षय लांजेवार , शंकर माहुरे व आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved