Breaking News

रविवार ला अंगणवाडी कर्मचारी बचत गट प्रतिनीधी व कामगार मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- समाजवादी नेते गोर गरीबांचे कैवारी स्व. भाई रहेमतुल्ला यांचे २९ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ अंगणवाडी कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी व कामगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी भवन, हजारे पेट्रोल पंप समोर, २८ जुलै २०२४ रोज रविवार सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्षा जि.प. भंडारा तथा कार्याध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) किसनाताई भानारकर ,मुख्य अतिथी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार,सत्कामूर्ती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,प्रमुख पाहुणे माजी अध्यक्ष जि. प.चंद्रपूर डॉ.सतिश वारजूकर,माजी सरपंच ग्रा.प.नागभीड जहांगीर कुरेशी,सामाजिक कार्यकर्ता लालाजी मेश्राम,सामाजीक कार्यकर्ता तळोधी (ना) शकील रहमेतुल्ला शेख आदी उपस्थित राहणार आहे.

परिसरातील नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अंगणवाडी ताईं व बचत गट प्रतिनिधीं सहभागी व्हावे असे आव्वाहन जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभाचे आवाहन इम्रान कुरेशी, माधुरी रमेश विर, प्रभा विश्वनाथ चामटक, रलता राजु देवगडे ललीता सोनुले विद्या वारजुकर संयोगिता गेडाम अन्नपुर्णा हिरादेवे ,रोशनी चंदेल व तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved