Breaking News

गणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर, ता. १८ :- अनंत चतुर्दशीला म्हणजेच रविवार १९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन होत आहे. यावर्षी नागपूर शहरातील तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. तलावाच्या शेजारी तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडातच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे करण्यात आलेल्या तयारीची पाहणी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी (ता. १८) केली.

त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, धंतोली झोन सहायक आयुक्त किरण बगडे, धरमपेठ झोन सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गांधीसागर, सक्करदरा, सोनेगांव, फुटाळा तलावाचा दौरा करून व्यवस्थेची पाहणी केली. तलावामध्ये विसर्जनाला बंदी असल्यामुळे प्रत्येक तलावांना टिनाचे कठडे लावण्यात आले आहे.

आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने कडक बंदोबस्त असावा, असे निर्देश त्यांनी संबंधित पोलिस निरिक्षकांना दिले. प्रत्येक तलावावर गर्दी नियंत्रण, निर्माल्य संकलन आणि विसर्जनासाठी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने ज्या स्वयंसेवी संस्था सहकार्य करीत आहे, त्यांच्याबद्दलही मनपा आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. गणेशभक्तांना त्रास होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. निर्माल्य संकलनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांसोबतच स्वच्छतादूतांचीही व्यवस्था उत्तम करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

गणेशभक्तांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी तलावात मूर्ती विसर्जन न करता मनपाने व्यवस्था केलेल्या विसर्जन कुंडातच मूर्ती विसर्जन करावी, घरगुती गणेशाचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, अथवा मनपाने व्यवस्था केलेल्या मोबाईल विसर्जन कुंडांची मदत घ्यावी, त्यासाठी मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक देण्यात आले आहे, त्याचा उपयोग करावा, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved