Breaking News

लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला लिपिक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

कोरपना :- कोरपना येथील तहसील कार्यालयामधील एक लिपिक व खासगी व्यक्तीला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दिनांक २६ रोजी दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मौजा वनोजा येथील वर्ग दोन ची शेतजमीन वर्ग एक करण्याकरिता समंधीत कागदपत्रांच्या नकल काढण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याला अव्वल कारकून विलास ठमके यांनी लाच मागितली होती.

या प्रकरणी मंगळवारी सापळा रचून कारवाई दरम्यान अव्वल कारकून विलास ठमके यांनी केलेल्या मागणीवरून खाजगी व्यक्ती प्रदीप आदे यांच्या मार्फतीने ठमके याचे करीता लाच रक्कम म्हणून स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना तहसिल कार्यालय कोरपना येथील आवारात पकडण्यात आले.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांचे नेतृत्वात ना पो का संतोष येलपुल वार, रवींद्रकुमार ढेगळे, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यानी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved