
प्रतिनिधी-कैलास राखडे
नागभीड: कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक शहरातील बाजारपेठला तेजी येऊ लागली परंतु नागभीड सारख्या मध्यवर्ती शहराच्या ठीकाणी अजुनही बाजारातपेठात तेजी येत नसल्यामुळे नागभीड चा आठवडी बाजार सुरू करावे अशी नगरसेवीका आशा गायकवाड यांनी मागणी केली आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर मार्च पासून लाॅकडाऊन झाल्यानंतर पहिल्यांदा शासनाने लाॅकडाऊन चे नियम शिथिल करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य तसेच ईतर कार्यक्रमाची परवानगी दिल्यामुळे व्यापार्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला,
पुन्हा शासनाने नाट्यगृह, सिनेमागृह व व्यापार लाईन नियमांचे पालन करुन पूर्ण समतेने सर्व सुरू करण्याचे निर्देश दिले आहे, त्यामुळे जिल्ह्यात व तालुक्यात ईतरत्र शहरात व मोठ्या गावातील बाजारपेठ ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. परंतु नागभीड सारख्या मध्यवर्ती शहराच्या ठीकाणी अजूनही बाजारपेठत मंदीचा वातावरण दिसून येत आहे.
नागभीड मध्ये यावर्षी मात्र पाहीजेत तेवढे अद्यापही खरेदीला कोणी बाहेर पडल्याचे दीसत नाही. नागभीड तालुक्यात व बाजारपेठत पुर्वी सारखी तेजी येण्यासाठी नागभीड नगर परिषदेने आठवडी बाजार सुरू करावे अशी मागणी नगरसेविका आशा गायकवाड यांनी केली आहे.