
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा :- वरोरा-माढेळी आणि गिरसावळी या रस्त्याला पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील सगळ्यात जास्त या रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली अपघात होण्याची शक्यता असून बांधकाम विभाग साखर झोपेत आहे.निवेदन व आंदोलनं करुन देखील त्यांना जाग आली नाही. माढेली ते गिरसावळी रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे म्हणून बांधकाम विभागाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन दिले तात्काळ रस्त्याचे काम सुरु करावी अशी विनंती केली रस्त्याचे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
रस्त्याची दुरवस्था झाली असून देखील रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नाहीं सार्वजनिक बांधकाम विभाग साखर झोपेत आहे . त्यांच्याकडे रस्त्याच्या कामाबद्दल निवेदन घेऊन दिले असून आमच्याकडे पैसे नाही असे सरळ सांगितले जाते . संपूर्ण वरोरा तालुका खड्डेमय झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल निघणार आहे बाजारपेठेत विक्री साठी नेताना रस्त्याच्या खड्डामुळे वाहनात कमी माल न्या लागत आहेत. लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे,
सायंकाळी प्रवास करने म्हणून जिवाला उधार होणे असे च या रस्त्याच्या अवस्थे मुळे झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी साठी बांधकाम विभागाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन दिले व रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष निलेश आडे , रोशन भोयर, जयंत चौधरी उपस्थित होते.