
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा : मागील एक दीड वर्षा पासुन वर्धा पावर व जी एम आर कम्पनी ला एकोना माईन्स मधून कोळसा पुरवठा होत आहे त्या साठी अनेक कंपनी धारक या कोळस्या ची वाहतूक वनोजा-नायदेव मार्गे कधी माढेळी-खांबाडा तर कधी वरोरा शहरातून 14चक्के मोठ्या वाहनाने वाहतूक करतात ,या वाहनाने अनेक मार्ग खराब होऊन मोठं मोठे खड्डे पडून स्विमिंग पुलाचे स्वरूप आले आहे.
ही जड वाहतूक वरोरा शहरातून होताना माढेळी नाक्यावर नागरिकांनी रोडवर उतरून गाड्या अडवून आंदोलने केली व कोळस्याच्या गाड्या दिवस रात्र अडून ठेवल्या गेल्या पण त्यावर ठोस निर्णय न झाल्याने युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी उपविभागीय अधिकारी याना 8 नोव्हेंबर ला निवेदन देऊन शहरातून जड वाहतूक बंद करण्यात यावी म्हणून निवेदन दिले , युवासेना चेआलेख रट्टे यांना एस डी ओ यांनी शहरातून जड वाहतूक फक्त रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत ची परवानगी दिली असल्याचे सांगितले.
परंतु हे कोळसा वाहतूकदार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाची उल्लंघन करून शहरातून केव्हाही वाहतूक करीत असताना काल चौदा चक्का 2 ट्रक थांबवुन याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली असता त्यांनी पोलिसांना कळविण्याचे सुचविले त्या प्रमाणे पोलिसांना कळविले असता पोलीस घटनास्थळी ट्रामा केअर हॉस्पिटल जवळ येऊन आलेख रट्टे याला विचारले की तू कोणत्या अधिकारात गाड्या अडविल्या तू आधी लेखी तक्रार दे नंतर कारवाई करू असे सांगितले त्या वेळी कोळश्याने भरलेल्या दोन्ही गाड्या एम एच 34 बी जी 4120 चौदा चक्का व दुसरा ट्रक एम एच 32 क्यू 6341 हे दोन्ही ट्रक पोलीस स्टेशन ला लावन्यात आल्या , आलेख रट्टे नी तक्रार दाखल केल्यावर पोलीस स्टेशन नी आलेख रट्टे ला सूचना पत्र देऊन ट्रक अडविण्याचा अधिकार कोणी दिला.
त्याचा खुलासा मागितला तर काही वेळाने ट्रक मालकांनी सुद्धा ट्रक अडविण्याच्या विरोधात आलेख रट्टे विरुद्ध तक्रार दिली असल्याचे कळते परंतु काही वेळातच पो स्टे मधून ट्रक सोडून दिले ते ट्रक गडचिरोली एरियात जात असल्याचे ड्रायव्हर ने सांगितले तर हा कोळसा एकोना मधून गडचिरोली कडे कुणाकडे गेला याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी युवासेना करीत असून या सम्पूर्ण प्रकरणाचा तपास एल सी बी चे बाळा साहेब खाडे मार्फत करण्याची मागणी युवासेने सोबतच जनतेनी केली आहे.