
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील मासळ, मदानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील केवाडा ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप भसक्तप्रल्हाद शेंडे ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.
सविस्तर माहिती अशी की ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयाला महिण्यातुन दोन ते तीन दिवस हजर असतात , दलित वस्ती सिंचन योजना टाकीचे काम होऊन सुद्धा त्या दलीत वस्तीतील 30 ते 40 जनतेपर्यंत पाण्याची सोय उपलब्ध करून दिले नाही व येथिल लाभार्थी नळ कनेक्शन पासून वंचित आहेत, बाकी नळ कनेक्शनचे लाभार्थ्यांना कनेक्शन मिळाले नाही. म्हणून जिल्ह्या परिषदचे सी.ओ. चंद्रपूर यांच्याकडे बाकी लाभार्थ्यांना लाभ मिळावा याकरिता विनंती अर्ज केला आहे व वैयक्तिक लाभार्थ्यांना पैशाची मागणी करीत आहे.
येथिल ठेदाराचे कामगार, तसेच मासिक सभेत कामाची विचारणा केली असता सरपंच व सचिव उडवा उडावीचे उत्तर देत असतात व दलित वस्तीचे काम , नाल्याचे काम, नळ योजनेचे काम कोणी केले असे विचारणा केली असता ते आम्हाला माहीत नाही असे उत्तर मिळत आहे.
गावातील सर्व नागरिकांना पाण्यासाठी कुठेही भटकंती न करावे यासाठी शासनाने गावागावात नळ योजना अमलात आणली व निधी ही देण्यात आले व पाण्याचा टाकीचे काम पूर्ण झाले असून सुद्धा मागील एक वर्षपासून ही नळ योजना बंद आहे व गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.
वरील सर्व कामाची माहिती येथिल सरपंच व सचिव यांना विचारले असता उत्तर मिळत नाही तरी केवाडा गावाचा विकासाकरिता वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, व पंचायत समिती अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी भक्तप्रल्हाद शेंडे यांनी केली आहे.