Breaking News

गडपिपरी ग्राम पंचायत सचिव यांचा मनमानी कारभार मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे वाकडे यांची तक्रार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सुधाकर लहानुजी वाकडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गडपिपरी यांनी ग्राम पंचायत सचिव सौ. प्रतिभाताई कन्हाके यांची संवर्ग विकास अधिकारी चिमूर मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांना तक्रार केली आहे.तक्रार अर्जा मध्ये सचिव हे चंद्रपूरवरून येणे जाणे करत असल्यामुळे कार्यालयात नेहमीच वेळेवर हजर राहू शकत नाही . त्यांना जनतेनी नेहमी कार्यालयात हजर राहायला संगीतले असता ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही .

त्यामुळे सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाने ठरवील्याप्रमाणे वेळेवर हजर रहाणे आणि वेळेवर येणे वेळेवर जाणे असा ठराव मासीक सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला व त्यानंतर तो ठराव लिहीण्यास त्यांना संगितले परंतु सचिव यांनी ठराव लिहीण्यास टाळाटाळ केली त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात जी ग्रामसभा घेण्यात आली त्या सभेमध्ये विविध चर्चा करण्यात आल्या .तेव्हाही ठराव सचिवांना लिहीण्यास सांगितले तेव्हाही सचिवाने तो ठराव लिहीण्यास टाळाटाळा केली त्यानंतर १० नोव्हेंबरला मासिक सभा घेण्यात आली .

त्या सभेमध्ये मि सचिव यांना नवेगाव ब्राम्हण नविन अंगणवाडी विषयी विचारले की नविन अंगणवाडी बांधकामाची देयके कोणाला , कधी किती पैसे दिले मला त्याचे एमबी बिल , साटा रजिस्टर व मजुराचे हजेरी रजिस्टर दाखवा असे विचारले असता त्यांनी एकही दस्ताऐवज उपलब्ध नाही असे सांगितले व मी तुम्हाला एकही दस्ताऐवज दाखवू शकत नाही . तुम्ही माझी तक्रार करू शकता असे त्यांनी मला उत्तर दिले .मी गडपिपरी ग्रामपंचायत सरपंच असताना माझे पद २१/०७/२०२१ ला रिक्त झाले .

आणि सचिव यांनी माझी डि.एस.सी लावून १०/०८/२०२१ ला सार्वजनिक नळाचे देयके २,३६,०२१ / – रूपये ची उच्चल केलेली आहे . तेव्हा माझी आणि शासनाची त्यांनी दिशाभुल केलेली आहे .तरी या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून सचिव सौ . प्रतिभा कन्हाके यांच्यावर योग्य ती कार्यावाही करण्यात यावी असे तक्रार अर्जा मध्ये सुधाकर वाकडे यांनी नमुद केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या रखडलेल्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या विविध अडचणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी बोलविली अधिकारी आणि नियुक्त कंपनीचे संयुक्त बैठक धरले धारेवर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:- दिनांक ०५/ १२/ २०२३ वार मंगळवार रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर …

चिमूर येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा नववा वर्धापन दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील येथील साई नगर येथे श्री साईबाबा यांच्या मूर्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved