
नागपूर दि.29 : गोरेवाडा प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल ड्राईव्ह (सफारी), बायोपार्क, नेचर ट्रेल येथे प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे गरजेचे असून त्यांना सदर ठिकाणी प्रवेशाकरीता दोन मात्राचे लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील.
ज्या पर्यटकांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्या नसल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल.
पर्यटकांनी कोरोना विषाणूने (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक व प्रतिबंधात्मक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी. पंचभाई यांनी कळविले आहे.