=कारवाई चे परिपत्रक काढूनही अद्याप कुठलीही कारवाईच नाही. नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली तर नाही ना?अशी दबक्या आवाजात चर्चा=
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला अपयश आले असून सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकदा अर्ज विनंती करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी केला आहे.
चिखली येथील कैलास सोनवाने यांनी घराचे बांधकाम केले यात त्यांच्या संडास आणि न्हाणी घराचे पाणी हे खुलेआम गंगा वाहत आहे तो पाणी दिलीप सोनवणे यांचा घरासमोरून वाहत असल्याने त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच गावातील नागरिकांना याचा खूप मोटा त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मागील चार महिन्यांपूर्वी पासून या बाबीची तक्रार अर्ज ग्रा प नेरीला दिला तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकारी यांना पाठवले तसेच उपसरपंच व सदस्य याना मौका चौकशी करून अहवाल सादर केला व लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी असे ग्रामपंचायत नेरी यांनी पत्र कैलास सोनवाने याना दिला. मात्र त्या पत्राचा काही उपयोगच झाला नाही.परंतु अजुन पर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही.
फिर्यादी दिलीप सोनवाने यांना पत्र देऊन नेरी ग्रामपंचायत सुस्त झोपेचे सोंग घेऊन आहे. याबाबत नेरी ग्रामपंचायत ला वांरवार विचारपूस केली असता नेरी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सदस्य यांनी सरळ शब्दात सांगितले की ही समस्या आमच्या अंतर्गत येत नाही.
ही सांडपाण्याची समस्या गंधगी ही ग्रामपंचायत अंतर्गत येत नाही तर नागरीकांनी जाव तरी कुठे नेरी ग्रामपंचायतनी कारवाईच परिपत्रक काढल तरी कस.? कि नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली खाली तर नाही ना अशी चिखलीवासी व आजुबाजूच्या नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.यापुढे नेरी ग्रामपंचायत कारवाई करुन समस्यांचा मार्ग काढेल का याकडे नागरीकांच लक्ष लागल आहे.