
पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमलेन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :-ग्रामीण भागात साहीत्य संमेलनाने समतामुलक समाज निर्माण होतो. आंबेडकरवादी साहीत्य व समाज यामध्ये साधारण अभिन्नत्व आहे. समतामुलक समाजाने बुद्धीजम तयार होतो याला आंबेडकरवादी साहीत्य रसायनासारखे उर्जा देत असतात याच उर्जेतून बोधी निर्माण होतात. या बोधी ला कोनतीही सिमा राहत नाही त्यामुळे परिवर्तनवादी समाज निर्माण होईल. मागील दोन वर्षापासुन काही कारणास्तव मानवी मन तुटलेल आहे. या तुटलेल्या मनाला जोडन्याचे काम आंबेडकरीवादी साहित्य करत असल्याचे मत पु.भ. ज्ञानज्योती महाथेरो यांनी पहीले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहीत्य संमेलनात उद्धघाटन भाषणात व्यक्त केले.
कलाकथीत बाजीराव सुकाजी खोबरागडे गुजगव्हान यांच्या स्मृती प्रत्यर्थ जागतीक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ, बौद्ध पंचकमेटी खानगाव, प्रबुद्ध बुद्ध विहार गुजगव्हान व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहीत्य संमेलन तथागताच्या संघारामगीरीतील खानगाव येथे पार पडले.
पुढे बोलताना भन्ते ज्ञानज्योती म्हणाले की, हे सर्व करन्यासाठी जनतेनी रस्त्यावर आले पाहीजे, कायदेशीर आंदोलने केली पाहीजे, आपल्या हक्कांचा लढा लढला पाहीजे.
पहीले जिल्हास्तरीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे उद्धघाटन पु.भ. ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले. कार्यक्रमाचे संमेलाध्यक्ष साहित्यीक व कवी माणिक खोबरागडे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष घनश्याम रामटेके, कार्यक्रमाचे अध्यक्ष साहीत्यीक व कवी दिपककुमार खोबरागडे, साहित्यीक व कवी अँन्ड भुपेश पाटील, कवी व लेखक सुधाकर चोखे, खानगाव च्या सरपंच अर्चना रामटेके, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष गौतम येसांबरे आदी उपस्थीत होते. आंबेडकरवादी साहित्य संमलेन चार सत्रात घेन्यात आले. पहिल्या व दुसऱ्या सत्रात अलाकडचे कृषी कायदे आणी डॉ आंबेडकरांचे विचार व आंबेडकरवादी साहित्याचे सामाजीक योगदान या विषयावर डॉ यशवंत खवसे, केशव मेंढे, डॉ रविंद्र तिरपुडे, डॉ हेमचंद दुधगवळी, प्रकाश राठोड, सर्जनादित्य मनोहर, डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रशांत धनविजय, नामदेव खोबरागडे, जगदीश मेश्राम यांनी विचार व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात कवि संमेलन घेन्यात आले या कवि संमेलनाला भानुदास पोपटे, जगदीश राऊत, मधु बावलकर, भुषण भस्मे, तन्हा नागपूरी, प्रमोद वाळके, प्रसेनजीत गायकवाड, शालीक जिल्हेकर आणि समारोपीय कार्यक्रमात माणीक खोबरागडे, हरी मेश्राम आदी उपस्थीत होते. चौथ्या सत्रात निर्माता, लेखक, दिगदर्शक, गितकार संदीप गायकवाड व नागेश वाहुरवाघ यांचा लघु चित्रपट क्रांतीगर्भ दाखविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान खानगाव येथील शासकीय सेवेत असलेल्या पुरुष महिला आंबेडकरवादी चळवळीतील योगदान परिसरातील लोक कलावंत व पत्रकार यांचा सत्कार वामनराव पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्रातील गायक उमेश बागडे यांचा भिम गिताचा बुलंद आवाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाने करन्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा आत्माराम ढोक, शिल्पा रामटेके, प्रास्तविक निलकंठ शेंडे, आभार प्रदीप रामटेके, सागर रामटेके यांनी केले.