
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा तर्फे अभिनंदनाचा वर्षाव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप मोहन कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी, मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली असून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभागातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,कुलदीपचे १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे झाले, धरमपेठ एम.पी देव कॉलेजमधून त्याचे पदवीचे शिक्षण झाले आणि त्यानंतर नामांकित इस्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्याने भौतिकशास्त्त्रात पदव्युत्तराचे शिक्षण पूर्ण केले.शेतकरी कुटूंबातून येणाऱ्या कुलदीपने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याने प्रसंगी मनरेगाच्या योजनेचे सुद्धा अनेक काम केले आहे. गावातील लहान विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा यासाठी तो सतत प्रयत्नशील होता.
आय.आय.टी, मुंबईत निवड होण्यापूर्वी ‘एज्युकेट गडचिरोली’ या फेलोशिपसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती आणि त्याने काही महिने कूरखेडा तालुक्यातील आश्रम शाळेत फेलो म्हणून अत्यंत प्रभावी काम केले.आय.आय.टी, मुंबईच्या प्रयोगिक सुष्मतरंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि अनुसंधान संस्था या प्रकल्पासोबत तो संशोधक वैज्ञानिक म्हणून काम करणार आहे. कुलदीप बालपणापासूनच फार मेहनती आणि होतकरू होता, मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीपची वैज्ञानिक म्हणून निवड होणे ही फार भूषणावह बाब आहे,कुलदीपच्या निवडीबद्दल चंद्रपुर वीभागिय अध्यक्ष अजय वैरागड़े, कार्याध्यक्ष प्रकाश देवतले, सचिव संजय खाटीक,सेवा आघाडी सावली अध्यक्ष तुळशीदास कुनघाडकर सर वीभागिय अध्यकक्षा कीर्ति कातोरे, सचिव मंगला डांगरे, युवा आघाडी अध्यक्ष श्रीहरी सातपुते, सचिव तुळशीदास भुरसे, गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष राहुल भांडेकर, सचिव विकेश नैताम, पंकज खोबे, यानी अभिनंदन केले,