Breaking News

संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने पैसे घेणाऱ्या दलाला पासून नागरिकांनी सावध राहावे

पैसे घेणाऱ्या दलालास शिवसेना पद्धतीने समज देऊ-श्रीहरी सातपुते

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-संजय गांधी निराधार योजनेच्या नावाने सध्या काही लोकांचा गोरखधंदा सुरु झाला असून निराधार व्यक्तिची केस बनविन्याच्या नावाखाली दलाल सक्रिय झाले असून नागरिकांनी सावध राहावे असे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे,केंद्र शाषन व राज्य शासनाने विधवा, अपंग, वृद्, नागरिकांना मदत म्हणून तहसील कार्यालयांच्या माध्यमातून विविध योजना काढल्या असून या योजनेच्या माध्यमातून गरजवंताना एक हजार रुपये प्रति महीना मानधन दिल्या जाते, प्रत्येक महिन्याच्या बैठकीमधे पात्र लाभार्थयाना संजय गांधी निराधार समितिच्या बैठकीत मंजूरी प्रदान करण्यात येत असून समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली सर्व सदस्य जास्तीत जास्त लाभार्थियांना लाभ करुण देण्याच्या प्रयत्न करीत असतात,

पण या योजनेच्या नावाखाली काही दलाल सक्रिय झाले असून या मधे खाजगी दलालासोबत महसूल विभागातील काही कोतवाल सुधा सामिल झाले आहेत, लाभ देण्याच्या नावा खाली केसेस बनविना करीता हजार ते दोन हजार रुपये घेतात व अपात्र असतानासुधा पात्र दाखविन्याचे प्रकार सरास पने सुरु झाले आहेत, अस्या दलालांपासून सावध राहण्याचे आव्हान संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी नागरिकांना केले आहे, गरजु लाभार्थीन कडून अतिरिक्त पैसे उकळन्याचा प्रयत्न केल्सास शिवसेना पद्धतीने समज देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved