
प्रतिनिधी – नागपूर
नागपूर:-मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जित कुने दो (कराटे ) स्पर्धेमध्ये जी टोकु काई असोशिएशन व ओकीनावा शोरीन ऱ्यू शोरीकान महाराष्ट्र नागपुर चे विद्यार्थी अव्वल आले.
स्पर्धेचे आयोजन ग्रॅन्ड मॉस्टर राजेंद्र गैरा यांनी केले होते. स्पर्धेमध्ये काता व कुमितेच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये काता व कुमिते वजन गटात १ )स्वरा पाैनिकर हिने दोन सुवर्ण पदक , २ )सुबोद भगत याने सुवर्ण , रजत ३ ) संस्कार शेंडे दोन सुवर्ण ४ ) अद्याश पौनिकर सुवर्ण , रजत ५ ) प्रणीता ठाकरे दोन सुवर्ण ६ ) श्रद्धा भटकर दोन रजत ७ ) शुभी सिंग दोन रजत ८ )कारुण्य थुल दोन सुवर्ण ९ ) मोहीत दरडे दोन रजत तर ब्ल्याक बेल्ट कुमिते चॉम्पीयनशीप मध्ये अपुर्वा भगत सुवर्ण तर ब्ल्याक बेल्ट काता चॉम्पीयनशीप मध्ये श्रृती मेंढे हिने सुवर्ण पदक प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय शिहान शाम भोवते , शिहान विनोद गुप्ता , सेन्साई पियुश देशभ्रतार व आपल्या आई वडलांना दिले. सर्वत्र नागपुर शहरात विद्यार्थांचे कौतुक होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.