Breaking News

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत गाजत स्वागत

मुलाना गुलाबपुष्प देऊन शाळेत प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- उन्हाळ्याच्या सुट्ट्या अंतर चिमुकल्यांची किलबिलाट दिनांक 29 जून बुधवारला शाळा गजबजुन गेली, पहिलाच दिवसी शिक्षकासह शाळा व्यवस्थापन कमेटिने पुष्पवृष्टि करीत ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागताने विद्यार्थीही भराऊन गेले, चिमूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (मुले) येथील शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाळेतील वातावरण आनंदमय व सुखमय झाले,

मुलांच्या स्वागतासाठी शाळेच्या दरवाजाची आकर्षक फुले फुगे यांनी सजविलेल्या कमालीची सजावट करुण मुलांचे व मुला मुलीसोबत आलेल्या पालकांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, त्यपूर्वी चिमूर शहरातील मुख्य मार्गानी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूकिमध्ये शिक्षकांसह पालकांनी सुधा सहभाग घेऊन उपस्थिती दर्शविली, शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थीना, गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले, व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मुलाना गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले,

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूरच्या मुख्याध्यापिका सौ. छाया खोबरागड़े, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी सातपुते, सहायक शिक्षिका सौ. सरिता गाड़गे, पालक मोहनीश जुमड़े, अजय जुमड़े, सुनील सातपुते, प्रमोद बनकर, अजय जुमड़े, लक्ष्मीकांत बावनकर, सौ. प्रिया हरदास, अश्विनी सातपुते, सोनू बावनकर, कविता सातपैसे, वनिता नागोसे, वैशाली मिसार, कुंदा यलने, नलिनी देवगिरकर, नालुताई कडुकर, मंगला राउत आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved