
अखेर शहर काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नाला मिळाले यश
पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनेक दिवसा पासून चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकरी देण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती. या संदर्भात मागील दिड वर्षापासून अनेकदा उपविभागीय अधिकारी, चिमुर यांचे मार्फत निवेदने देऊन अनेक वेळा शासनाला मागणी केली होती परंतु शासनाकडे काही कारणामुळे राज्यात मुख्याधिकारी यांची संख्या कमी असल्याने सध्या दिड, दोन वर्षांपासून चिमूर ला प्रभारी मुख्याधिकारी आहे म्हणून कळवण्यात आले होते,
आता शासनाने चिमुर नगर परिषदेला खुशाल अनुभवी मुख्याधिकरी म्हणुन सिंदेवाही नगर पंचायतला गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या मुख्यधिकारी श्रीमती सुप्रिया राठोड यांची चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता चिमुर नगर परिषद क्षेत्रातील जनतेची कामे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे,
चिमुर नगर परिषदेच्या स्थायी मुख्याधिकारीपदी जवाबदारी स्विकारल्याबद्दल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या उपस्थित नवनियुक्त मुख्याधिकारी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या व चिमुर नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्यावश्यक समस्या घरकुल योजना,शहरात स्वच्छता बद्दल, पुर पीडित प्रभाग याबद्दल जनतेला मदत अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली,यावेळी मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख,तालुका सचिव विलास मोहिनकर, जिल्हा महासचिव गौतम पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे , राजु पाटील, नईम शेख आदी उपस्थित होते.