
कु. समायरा रामटेके ची ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमासाठी निवड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-‘शाळे बाहेरची शाळा’ उपक्रम विभागीय आयुक्त,नागपूर आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवित आहोत. हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ला घेण्यात येत आहे.“शाळेबाहेरची शाळा” हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या नागपूर ‘अ’ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जातो,
समायरा शुभम रामटेके, रा. सावरी तालुका – चिमूर, जिल्हा – चंद्रपूर या अंगणवाडीतील विद्यार्थिनीची 334 भाग करिता शाळे बाहेरची शाळा उपक्रमा अंतर्गत निवड झाली आहे. हा कार्यक्रम 04/08/2022 रोजी गुरुवारला नागपूर आकाशवाणी वरून सकाळी 10:30 वाजता प्रसारित करण्यात येईल,
बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम मॅडम यांच्या प्रोत्साहनामुळे अंगणवाडी क्र.2 सावरी यांना बहुमान मिळाला आहे.पर्यवेक्षिका अनुसया चौधरी सर्कल सावरी,अंगणवाडी सेविका पौर्णिमा रामटेके सावरी यांचे मार्गदर्शन लाभले सर तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वैभव निर्मळ, मंगेश ढगे यांनी विशेष कौतुक केले.