
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील म्हसली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनीय अवस्था झाली आहे. या इमारतीच्या आवारात पाऊसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करून हाजरी लावावी लागत आहे, या ठिकाणी सर्वत्र पाणी साचून तलाव झाल्याचे चित्र दिसत आहे, त्याच प्रमाणे शाळेतील भिंतीमध्ये मोठे मोठे भेगा पडल्याने विंचू साप येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची शक्यता आहे. तरी या संदर्भात पालकांनी शाळा व्यवस्थापक समिती यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केल्या जात होते,
या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रहार सेवक प्रवीण वाघे व सामाजिक कार्यकर्ते विलास पिसे यांना तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने प्रहारसेवक प्रवीण वाघे सामाजिक कार्यकर्ता विलास पिसे यांनी म्हसली गावातील शाळेला भेट देऊन या संदर्भात गावातील सरपंच व उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती यांना बोलावून चर्चा केली रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली,
तरी शाळेतील परिसरात 2 दिवसात मुरूम न टाकल्यास प्रहार संघटनेकडून लोटांगण आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारसेवक प्रवीण वाघे व सामाजिक कार्यकर्ते विलास पिसे यांनी दिला होता दोन म्हसली ग्रामपंचात नी दिवसात शाळेच्या आवारातल पाणी काढन्याचा प्रयत्न केला.आनी आजही परीस्थीती जैसें थे आहे सरपंच उपसरपंच या॓नी खोटे आश्वासन देऊन शा॓त बसले आहेत, याचा अर्थ रडु नको ऊगा राय अशी असनारी परीस्थीती आहे, जंगलात एवढा कचर्याचा एवढा वास्तव नाही तेवढा म्हसलीच्या जिल्हा परीषद शाळेत दिसुन येतो. सा॓भाळुन रे दोस्ता शाळेत जाता॓ना आनी वर्गात धोका होऊ शकतो अशी म्हनायची वेळ आली आहे,
याबाबत काही दिवसापुर्वी म्हसली येथे विविध समस्साबाबत बैठक लावण्यात आली,मात्र समस्सा मार्गी लावन्याचा विषय भरकवटत म्हसली ग्रामपंचात उपसरपंच प्रमोद खोब्रागडे या॓नी त प्रहार सेवकाला प्रश्न विचारला कोन होय रे तो तुमच्या कडे तक्रार करनारा सांग बर त्याच नाव हार टाकुन स्वागतच करतो,
म्हणजे याचा अर्थ असा की शाळेत विविध समस्या असून विद्यार्थ्यांसोबत खेळ खंडोबा चालु असतांना हा उपसरपंच तक्रार दाराच नाव विचारुन स्वागत करतो म्हनतो नेमकी या उपसरपंचाच्या बुद्धीला म्हणावं तरी काय खरच गावच्या उपसरपंचाला विकासाची तळमळ आहे की स्वागताची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रहार संघटना, प्रशासन व म्हसली ग्रामपंचात विरुद्ध आक्रमक होऊन आंदोलनाची भुमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल असे सा॓गीतले आहे.