
कोणतीही पूर्व सूचना न देता बँक खात्यातून रक्कम केली कपात
प्रतिनिधी – वर्धा
वर्धा:- अतिवृष्टीने आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे, त्यात बँकेचे नवीन संकट पंजाब नॅशनल बँक तरोडा येथील मॅनेजरने शेतकऱ्याच्या सेविंग खात्यामधील जमा असलेले पैसे कर्ज खात्यात कोणतीही पुर्वसूचना न देता कपात केले आज शेतकऱ्यावर जी परिस्थिती उद्भवली आहे शेती पाण्यामुळे खराब झाली आहे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे,
त्या परिस्थिती मध्ये थोडेफार जमा असलेले पैसे मॅनेजर नि कपात केले आहे कपात केलेले पैसे लवकरात लवकर जमा करण्यात यावे अन्यथा बँक मधेच उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यानी दिला आहे त्याकरिता निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, भुषण झाडे, सुरज गुळघाणे, राहुल चांभारे, अनिल चांभारे, प्रफुल चांभारे उपस्थित होते.