
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच श्री गुरुदेव कार्यकर्ता भिशी ग्रुप व समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम व श्रमदानातून ताडाळी स्मशानभूमीचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. आपण जिथे राहतो, तो परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच निरोगी राहण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवावा, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. ताडाळी येथील स्मशानभूमीत डॉ. प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात श्रमदान मोहीम राबवण्यात आली.
समान संधी केंद्राची स्थापना : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय आणि सरदार पटेल महाविद्यालय येथे समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या कॉलेज संबंधी तसेच शिष्यवृत्तीच्या अडचणी सोडविण्यात बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्री. बनसोड, श्री. कांबळे उपस्थित होते.