
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोडखा मोकाशी येथे स्वछ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती वरोरा आयोजित पुरोषत्तम साळवे महाराज (खरवड) यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थीना सोबत घेऊन एकदिवसीय व्यसनमुक्ती शिबीर राबविले. त्या शिबीर मध्ये लहान मुलांनी व्यसन करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी,बेटी बचाव, स्वच्छता अभियान, महापुरुष आदर अश्या विविध विषयवार मुलांशी सवांद साधून शिबीर राबविले.
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेशी एकनिष्ठपणा राखून सर्व जनतेनी व्यसनमुक्त रहावे असा संदेश पुरोषत्तम साळवे महाराज यांनी सर्व मुलांना व गावकर्यांना दिला. त्यावेळी उपस्थित शाळेतील शिक्षक माजी मुख्याध्यापक तडस सर,मुख्याध्यापक मोठघरे सर, गायकवाड सर, मेश्राम मॅडम व गावातील नागरिक शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, माजी पोलीस पाटील आनंदराव कामडी, गुरुदेवसेवक शिवा पंधरे,सचिन चिडे, चिंधुजी बलखंडे, उत्तम तुराळे, वसंता चौरे,श्रीहरी बलखंडे, हरिभाऊ तुराळे, शंकर सोयाम, विजय तुराळे, बाळू मसराम, भाऊराव तुराळे, बगणे पाटील, मयुर बगणे तसेच शालेय विद्यार्थी, नागरिक युवक उपस्थित होते, कार्यक्रमाला सहकार्य गणेश चिडे व आभारप्रदर्शन गायकवाड सर यांनी केले.