
चिमूर तालुक्यातील 45 शाळा होणार बंद – शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र विरोध
शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या – अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु -श्रीहरी सातपुते
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे, या शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला, तो अन्यायकारक निर्णय रद्द करून जनतेचा असंतोष कमी करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचे मार्गद्शनात चिमूर शिवसेना माजी तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे,
ग्रामीण भागातील वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वय फार कमी असते, ते बालक असतात त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाताना ग्रामीण भागात जाण्या येण्याची कुटलीच सुविधा नसते, अश्यावेळी शाळा बंद केल्या तर ते शिक्षण घेणार कसे, त्यातच चिमूर तालुक्यातील एकूण 45 शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे, या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य पुढील काळात अंधकारमय होणार आहे, ते शिक्षणापासून कोसो दूर राहतील अश्या वेळी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, जर असे झाले नाही तर ग्रामीण भागातील जनता विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशारा चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर बोरकर, तालुका समन्वयक देविदास गिरडे माजी उपजिल्हा प्रमुख अनिल डगवार, उपतालूका प्रमुख केवल सिंग जुनी, माजी तालुका प्रमुख सारंग दाभेकर तालुका संघटक रोशन जुमडे, शहर प्रमुख सचिन खाडे, माजी विभाग प्रमुख संतोष कामडी, देवा मसराम, समीर बल्की,प्रफुल कमाने, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, सह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.