
नागपूर – प्रतिनिधी
नागपूर:-आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र व राज्य आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रम आज दिनांक 21/10/2022 रोजी सकाळी 8,00 वा, प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून मा, उपसंचालक डॉ, विनिता जैन यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली,
प्रशिक्षण केंद्रावर सर्व कर्चारी अधिकारी वर्गांमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ, गोगुलवार सर, राज्य आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे डॉ, योगेंद्र सवाई,,, वरिष्ठ वैज्ञानिक/ पोषण आहार ,,डॉ, शंभरकर,, महानगरपालिका नागपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ, बहिरवार डॉ, राठोड मॅडम ,डॉ, चांहांदे मॅडम ,हेडाऊ सर, श्रीमती कडू मॅडम, चौरे सर ,चांदणे सर, यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली, हातात, जनजागृती चे पोस्टर घेऊन राष्ट्रीय आयडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाविषयी घोषवाक्य देऊन काशीपुरा या परिसरात जाऊन प्रशिक्षणार्थ्यांनी बसवलेले पथनाट्य करण्यात आले,
या पथनाट्य मध्ये आयोडीनच्या अभावामुळे होणारे गलगंड, पूजेपणा ,मतिमंद, तीरलेपणा, गर्भवती मातेस आयोडीनच्या अभावी मृत बालक जन्मास येणे, गर्भपात, अर्भक कमी वजनाचे जन्मास येणे, व मिठाचा योग्य वापर करणे,मिठाचे प्रमाण आहारात योग्य घेणे, दररोज प्रौढ व्यक्ती 150 मायक्रोम ची आवश्यकता असते, गरोदर मातेस व स्तंनदा मातांमध्ये 200 मायकोग्रामची गरज असते,
0 अर्भक ते11 महिन्यापर्यंत बालकास पन्नास मायक्रोम ची आवश्यकता असते, परिसरात प्रशिक्षणार्थींनी घरोघरी जाऊन मीट नमुने युरीन सॅम्पल तपासणीसाठी जमा करण्यात आले,
कार्यक्रमात शेवटी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात प्राचार्य डॉ,गुगलवर सर ,डॉ, योगेंद्र गवळी सर ,,डॉ,शंभरकर सर, डॉ, राठोड मॅडम, डॉ,चांहांडे मॅडम ,,श्रीमती कडू मॅडम,चौरे सर, चांदने सर, व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.