
अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे – डॉ.सतिश भाऊ वारजुकर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- आज दिनांक २८/११/२०२२ ला चिमूर येथे अतिक्रमण धारकांना सरकारी गायरान जमिनीवरील केलेले निवासी अतिक्रमण काढने बाबत ,आंबोली, शंकरपूर, गदगाव, पिटीचुवा ,काग, शेडेगाव अशा अनेक गावातील नागरिकांना तहसील कार्यालय चिमूर येथून घरे पाडण्याकरीता नोटीस पाठवली असता आज तहसील कार्यालय चिमूर समोर डॉ. सतिश भाऊ वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले व अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे व त्यांच्यावर केलेली कार्यवाही थांबवावी या साठी निवेदन देण्यात आले.
या वेळी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, ओबिसी विभाग अध्यक्ष विलास डांगे,माजी बाधकाम सभापती कदिर चाचा शेख, मिडिया प्रमुख पप्पू शेख,अविनाश पाटील,राजू भाऊ दांडेकर,मनोज सरदार, धुरपताताई पाटील,शुभांगी नागदेवते,किरंताई तांबोळे, लताताई भोगे व समस्त गावातून आलेले नागरिक यावेळी उपस्थित होते.