Breaking News

कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 29 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते रोजी करण्यात आले.बालविरोधी सप्ताहनिमित्त कामगार विभागामार्फत विविध ठिकाणी धाडसत्र राबविण्यात येवून बालकामगार तपासणी करण्यात आली. आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाही,

अशी हमीपत्रे भरून घेण्यात आली. तसेच 21 नोव्हेंबर रोजी दुकाने व आस्थापना असोसिएशन, होटेल असोसिएशन, मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन आणि विविध कामगार संघटना यांच्या बैठका आयोजित करून सुधारित बालकामगार अधिनीयम व त्यातील दंडात्मक तरतुदीची माहिती देण्यात आली. तसेच बालकामगार आढळल्यास कामगार आयुक्त कार्यालय किंवा हेल्प लाईन क्रमांक 1098 यावर संपर्क करण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांचेमार्फत आवाहन करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved