
संताजी जगनाडे महाराज जयंती दिनी श्रीहरी सातपुते यांचे विद्यार्थ्यांना आव्हान
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुले चिमूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जगतगुरु तुकाराम महाराज यांचे पटशिष्य संताजी जगनाडे महाराज यांनी समाज कंठकानी तुकाराम महाराज यांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्या, या प्रकारामुळे तुकाराम महाराज समाधिस्त झाले होते, पण संताजी जगनाडे महाराज यांनी परिसरातील गावा गावात जाऊन त्यांनी त्यांनी गाथा संकलन केल्या, त्यांना पाठ असलेल्या ओव्या पुन्हा लिहून काढल्या, तुकाराम महाराज यांचे पर्यंत ओव्या पोहचू नये म्हणून संताजी जगनाडे महाराज यांचे वर सुधा समाज कंठकानी अत्याचार केले.
तरी सुधा सर्व हाल अपेष्टा सहन करीत तुकाराम महाराज यांच्या गाथा तयार करून जनतेसमोर आणीत गरू शिष्याची परंपरा जोपासली त्याच पद्धतीने आपल्या गृऋचे मार्गदर्शन घेऊन संताजी महाराजांचे विचार आत्मसात करीत गुरू शिष्य नाते जपावे, असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्रत्मिक शाळा चिमूर येथील कार्यक्रमात अध्यक्ष महनुन बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात संताजी जगनाडे महाराज यांचे फोटोला दिप प्रज्वलन करुन व मल्यारपन करून करण्यात आले, यावेळी मंचकावर मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, सह्यायक शिक्षिका सरिता गाडगे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चिमूर तालुका अध्यक्ष किशोर येलने उपस्थित होते, मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे यांनी सुधा संताजी जगनाडे महाराज यांचे जिवणकार्यावर मार्गदरशन केले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका सरिता गाडगे यांनी केले.