
आरोपी चिमूर पोलिसांच्या ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-संपतीच्या वादातून पुतण्याने स्वतःच्या काकाचा खून केल्याची थरारक घटना चिमूर शहरात घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे,मृतक प्रभाकर नागोसे यांचा पुतण्या रूपेश पत्रु नागोसे हे दोघेही नात्याने एकमेकांचे चुलते-पुतने आहेत. प्रभाकर यांच्या वडीलाने सहा मुलांना शेतीचा समान हिस्सा देऊन स्वत:करीता एक हिस्सा ठेवला होता, मृतक प्रभाकर ने आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केल्यामुळे वडील मरण पावल्यानंतर त्यांचा हिस्सा मृतकाने स्वतः ठेवुन घेतला. तसेच मृतकास कोणतेही अपत्य नसतांना तो प्लॉट विक्रीचा व्यवसाय करुन दोन वर्षापुर्वी नविन घर बांधुन प्रगती करीत असल्याचा रुपेशला राग होता त्या रागामुळे प्रभाकर नागोसेचा खून झाला.
दिनांक २७/१२/२०२२ रोजी दुपारी ०३/०० वाजताच्या सुमारास आरोपी हा कामावर असलेल्या बुट्टीबोरी, नागपूर येथून मृतकास नुकसान पोहचविण्याचे उद्देशाने चिमूर येथे घरी आला. परंतु मृतक हा घरी हजर नसल्याने त्याने प्रथम मृतकच्या पत्नीशी झगडा-भांडण केले. काही वेळात मृतक हा घराकडे येतांना दिसताच आरोपीने मृतकाच्या घरात शिरुन लाकडी स्टुल फरशीवर आदळून तोडले व स्टुलच्या पायाचा दांडा घेऊन रोडवर आला व मृतक हा घरात प्रवेश करण्याच्या आधीच घराजवळील रोडवर आरोपीने मृतकाच्या डोक्यावर स्टुलच्या पायाचा दांडयाने वार करुन खुन केला.
तसेच मृतकाच्या पत्नीला कोणाला सांगीतल्यास ठार मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरील रक्ताच्या डागावर पाणी टाकुन पुरावा नष्ट केला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथून प्राप्त झालेल्या ब्रॉड डेथ मेमो वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
गुन्हयाचे घटनास्थळास सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ भेट असुन शासकीय पंचाना पाचारण करून पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा नोंदविण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतकाचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतकाच्या मृत्युसंबंधाने वैद्यकिय अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आरोपी रुपेश यास ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गजभे यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अलीम शेख, सुशीकुमार सोनवणे करीत असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.