
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी(प्र):-वाडी परिसरा लगत असलेल्या सोनबा नगरात एका कबडीच्या दुकानाला रात्री उशिरा अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीत अंदाजे 40ते50 हजार रुपये पर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
खडगाव रोडवरील सोनबा नगरात मानकर सभागृहाच्या जवळ मुन्ना रामप्रसाद शाहू यांचे अनमोल स्क्रॅप सेंटर या नावाने कबाडी व्यवसायाचे दुकान आहे, या दुकानाला रात्री उशिरा आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वाडी पोलीस ठाण्यातुन वाडी नप. च्या अग्निशमन विभागाला रात्री12वाजून15 मी.ला मिळाली.
लागलीच मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या सूचनेवरून अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे अग्निशमन दला सह घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, तो पर्यंत नागपूर मनपाचे अग्निशमन दल सुद्धा आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.
आगीत अंदाजे 40 ते 50 हजार रु. चा कबाडी माल जळून नुकसान झाल्याचे व्यवसाय मालक कडून माहिती मिळाली मात्र आग लागण्याचे कारण कळू शकले नाही, आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे सह फायरमन आनंद शिंदे, शुभम डांगले, अनुप धोपटे, राहुल वंजारी,वाहचालक – राहुल वंजारी इ. नी प्रयत्न केले.