Breaking News

विद्यार्थ्यांचा तंबाखू मुक्तीचा सकल्प

अभिनव उपक्रम नववर्षाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतली तंबाखू मुक्ती ची शपथ

प्रतिनिधी नागपूर

नागपूर:-शालेय जीवनापासून चांगल्या सवयी आणि शिकवण मिळाल्यास निरोगी समाज निर्माण होऊ शकते ,त्यामुळे नववर्षाला इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या पुढाकारातून आणि ऐकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा व शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकिय आश्रम शाळा व शासकीय वस्तीगृहे,येथील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली व तंबाखू च्या दुष्परिणामांची जागृती करण्यात आली , या जागृती नतर विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीचा सकलप घेतला , महाराष्ट्र राज्यतील प्रत्येक विद्यार्थी भविष्यात व्यसन मुक्त व आरोग्य सप्नन रहावा या करीता आदिवासी विकास नागपूर विभाग , इंडियन डेंटल असोसिएशन नागपुर तर्फे तंबाखू मुक्त शाळा व वसतिगृह हा महत्व आभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा मुख्य उद्देश तंबाखूच्या दुष्परणामांची जाणिव विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना करून देने,तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ,शालेय स्तरावर प्रभावी अमल बजावणी करणे,सर्व आश्रम शाळा व वसतिगृहे तंबाखू मुक्त करणे ही आहेत ,समाज व विद्यार्थ्यांना मध्ये व्यसन विरोधी मानसिकता तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.

 

आदिवासी प्रकल्प कार्यालय चिमूर अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी शाळा आणि सर्व आदिवासी वसतिगृह मध्ये नव वर्षाचा सुरवातीला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरच्या तर्फे सर्व शाळा व वसतिगृहामध्ये शपथ देण्यात आली , शासकीय आदिवासी आश्रम शाळा चंदनखेडा येथे उपस्थित सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना शपथ इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरचे ,चिमूर पी ओ समन्वयक बांगडे सर यांनी ,तंबाखू सेवन आरोग्यास कशे हानिकारक आहे या बद्दल विद्यार्थाचे संबोधित केले .आपल्या पालकांना व नातेवाइकांना सेवनाचे दुष्परिनाम सांगून निर्व्यसनी जीवन कसे जगावे या बाबत मार्गदर्शन केले .या अभियानाचे मुख्य अध्यक्ष डॉ.वैभव कारेमोरे सर , सचिव डॉ. पूनम हुडिया मॅडम प्रकल्प समन्वयक सतीन अंकुलू सर ,तसेच या प्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशन नागपूर चे चिमूर पी ओ समन्वयक गीतेश सर, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक वामन रिंगणे सर, सोनोने सर माध्यमिक शिक्षक,कु.एस.पी.गजभिये , माध्यमिक शिक्षक,एम.टी.उराडे पदवीधर शिक्षक,सौ.आर.डी. भगत, प्राथमिक शिक्षीका,अमोल मसराम, व्यवसाय मार्गदर्शक,कु.पुजा डेकाटे, संगणक शिक्षिका यांचा सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिस भरती प्रकियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 …

शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved