
मागील दीड महिन्यापासून वाहनचालक मालक कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकले
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी – वाहनचालकांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वाहन म्हटले की वाहनांची कायदेशीर सर्व बाबी करुनच वाहन रस्त्यावर धावत असते आणि याला प्रादेशिक परिवहन विभाग परवानगी देत असून सर्व परवान्याचे कागदपत्रे प्रमाणपत्र देत असते परंतु मागील दीड महिन्यापासून काही प्रवासी वाहनाचे प्रादेशिक विभागात वाहन पासिंग झाले असून जी पी एस अपलोड होत नसून वाहनाचे नवीन
फिटनेस होत नसल्याने वाहनांचे चाके थांबली असून वाहन रस्त्यावर धावू शकत नाही त्यामुळे वाहन चालक हताश झाले असून अनेकदा कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकले आहे वाहने थांबल्यामुळें त्यांचा रोजगार थांबला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे तेव्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
सदर असे की चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात काही प्रवासी वाहने पासिंग आणि इतर कागदपत्रे व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत यामध्ये वाहन पासिंग विमा आणि इतर सर्व प्रमाणपत्र तयार झाले आहेत परंतू जीपीएस अपलोड अपडेट होत नसल्याने वाहन फिटनेस प्रमाणपत्र मिळत नसल्याने वाहनाला रस्त्यावर धावण्यात अडचण निर्माण होत आहे सदर वाहने हे मागील दीड महिन्यापासून थांबले असून वाहनचालक कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत त्यामुळे त्यांचा रोजगार थांबला आहे समोर महाशिवरात्री असल्याने अनेक ग्राहक वाहनांची मागणी करीत आहेत परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दिरंगाई धोरणामुळे वाहलचालकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे आधीच कोरोनामुळे 2 वर्षे वाहनांची चाके थांबली होती त्यामुळे वाहनचालक मालक उघड्यावर आले होते आणि आता कसेतरी रोजगाराला लागले असताना प्रादेशिक परिवहन कार्यल्यामुळे पुन्हा एकदा उपासमारीची पाळी वाहनचालकांवर व मालकावर आली आहे.
सदर बाबतीत वाहन चालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात विचारणा केली असता त्यांनीसांगितले की तांत्रीक अडचणीमुळे सदर काम थांबले आहे परंतु वाहन रस्त्यावर धावू शकते कार्यालय तसे पत्र देऊ शकते परंतु यात मोठी अडचण अशी आहे की राज्यात कुठेही वाहन चालवू शकतो परंतु बाहेर राज्यात हे पत्र चालणार नाही तेथील प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहन थांबवणार आणि दंड आकारणार वाहन जप्त करतील अशी चर्चा वाहनचालकात सुरू आहे तेव्हा या गंभीर बाबींची दखल प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून वाहनाचे जीपीएस अपलोड करून फिटनेस प्रमाणपत्र द्यावे व वाहनाला रस्त्यावर धावायला अडचण निर्माण होऊ नये यासाठी दखल घ्यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.